खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक

खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक

अलवर : ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवल किशोर मीणा यांना 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एका चिटफंड खटल्यात मालमत्ता जप्त न करण्यासाठी मध्यस्थामार्फत ही लाच मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बाबूलाल मीना असं या मध्यस्थाच नाव असून त्याला लाचेच्या पैशांसह अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अलवरमध्ये ही कारवाई केली आहे. (ED officer Naval Kishore Meena arrested on charges of accepting bribe of Rs 15 lakh)

ED Raids : दिल्ली सरकारचा आणखी एक मंत्री ‘ईडी’च्या कचाट्यात; तब्बल 9 ठिकाणी छापेमारी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नवलकिशोर मीना हे मुळचे जयपूरमधील बस्सी येथील रहिवासी आहेत. सध्या ईशान्येतील मणिपूरमधील इंफाळ येथे ‘ईओ’ म्हणून ते कार्यरत आहेत. तर बाबूलाल मीना हे देखील बस्सी येथील आहेत. ते अलवरच्या खैरथल येथे सब रजिस्ट्रार कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील चिटफंडशी संबंधित एका प्रकरणात मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि अटकेपासून बचावासाठी 17 लाख रुपयांची लाच मागितल्याची राजस्थानच्या लाच लुचपत विभागाला प्राप्त झाली होती.

Arvind Kejriwal : चौकशीला दांडी, केजरीवाल गाठणार ‘एमपी’; ‘आप’च्या खेळीने ‘ईडी’ही गोंधळात

मध्यस्थ बाबुलाल मीना मार्फत ही लाचेची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नवलकिशोर यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती असल्याचे आढळून आले. यानंतर लाचलुचपत विभागाने अलवरमध्ये त्यांच्याविरोधात सापळा रचला. यात बाबुलाल मीना याला नवलकिशोर यांच्यासाठी 15 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. सध्या दोघांनाही अटक करण्यात आली असून मोठे प्रकरण असल्याने लाच लुचपतचे अन्य अधिकारीही अलवरला रवाना झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube