T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर धक्के, 4 धुरंधर दुखापतीने त्रस्त

T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर धक्के, 4 धुरंधर दुखापतीने त्रस्त

T20 World Cup : टीम इंडियाला नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) देखील प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे 4 स्टार खेळाडू जखमी झाले असून त्यांच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी (Mohammad Shami), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा समावेश आहे.

हार्दिक पांड्या
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. या स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकच्या टाचेला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो आतापर्यंत पुनरागमन करू शकला नाही.

मोहम्मद शमी
आताच्या झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये मोहम्मद शमी हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. शमीने 7 सामन्यात 10.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 24 विकेट घेतल्या होत्या. शमीच्या घोट्याला दुखापत झाली असून त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याआधी शमीचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्यानंतर बीसीसीआयने दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.

Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत

सूर्यकुमार यादव
एकदिवसीय विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत भारताची कमान सांभाळली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. सूर्याला ग्रेड-2 दुखापत झाली आहे. मात्र, सूर्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सूर्या हा भारतीय T20 संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

ऋतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघाचा भाग होता. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर गायकवाड उर्वरित आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube