Nana Patekar: ‘ओले आले’ सिनेमाच्या नावाबद्दल नाना पाटेकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Nana Patekar: ‘ओले आले’ सिनेमाच्या नावाबद्दल नाना पाटेकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Marathi Movie) दमदार अभिनयाच्या जोरावर नानांनी जवळपास तीन दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. याचबरोबर ते स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकत्याच लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी ‘ओले आले’ या सिनेमाच्या नावाबद्दलचा खुलासा केले आहेत.

नेमकं काय म्हणाले नाना? म्हणाले की, सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मी सांगितलं होत ‘ओले आले’ असं सिनेमाचं नाव ठेवा. मात्र सिनेमाच्या दिग्दर्शकाचं मत दुसरचं होत? आणि यावर बरीच चर्चा रंगली. आणि त्यावेळेस अचानक सुचलं आणि लगेच मी डायरेक्ट सांगितलं की, ज्याच्यातून तुमची गोष्ट कोणाला कळणारचं नाही, असं नाव ठेवा. नाहीतर मग मलाजीवसेना वगरे असले नाव ठेवण्यात काही अर्थ नाही.’ओले आले’ हे नाव उत्तम आणि जॉनर प्रोजेक्ट करतायं, आणि तो प्रोजेक्ट जॉनर आहे की नाही…  हे चाहते ठरवतील, असा गौप्यस्फोट नाना पाटेकरांनी यावेळी केला आहे.

Nana Patekar : बाळासाहेबांनंतर मातोश्रीशी संबंध संपला; राज-उद्धव ठाकरेंवर नाना पाटेकर नाराज

पुढे नानांनी सिद्धार्थ आणि सायलीबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. या तिघांनी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं आहेत. शूटिंग दरम्यान मल्लाहरच समोर आणि तोच मी करतोय असं नाही. सिद्धार्थ जरी असला तरी ती तो माझाच वाटतो, आणि सिद्धार्थ अप्रतिम नट तर आहेच पण माणूस म्हणून तो खूपच गोड आहे. त्याच्याकडे खूप क्लेरॅटी आहे. आणि तो या अभिनयाला ज्या पद्धतीने इमोट करू शकतो. म्हणजेच जस जसं तुमचा अनुभव वाढत जातो. तस तसं तुमच्यमध्ये सुधारणा होत असतात. परंतु, सिद्धार्थ हा उत्तम अभिनय सादर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.

या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आपल्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत (Nana Patekar) मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube