Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत

Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत

Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकत्याच लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी नटाचं दुःख अन् सिनेमा पलीकडील नाना…याबद्दल खंत व्यक्त केले आहेत.

आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना कायम तयार असतात. नाना पाटेकरांनी नटाचं दुःख नेमकं काय असतं? याबद्दल खंत व्यक्त केले आहेत. म्हणाले की, अभिनय करत असताना सिनेमातील पात्रांशी आम्हाला जवळीक करावं लागत असत. तर तू या भूमिकेमध्ये असा, आणि त्या भूमिकेमध्ये तसा त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या दुःखाना सामोरे जायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजेच ज्यांच्याकडे दुःख आहे ती माणसं तुम्हाला पाहता आली पाहिजे.

आमच्या माध्यमांमुळे आम्हाला कुठे जाता येत, कोणती माणसं भेटतात, कोणती ऐकायला मिळतात. तयातून मला खूप सोप्प जात, पण तुम्ही चार भिंतीमध्ये राहूनच परदेशी सिनेमे पाहून जर म्हणत असाल तस करू, तर तस नाही होत. उधारीचं जो अनुभव आहे. तो आणि तुमचा स्वतः चा जो आहे, त्यामध्ये फरक आहे ना? त्यामुळे काम करत असताना कदाचित फिरत असेल, मी नेहमी म्हणतो की फिरा, बघा. जो पर्यंत नट मंडळी कधीही आयुष्यामध्ये सुखी असू शकत नाहीत. असं माझं स्पष्ट मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Nana Patekar: ‘ओले आले’ सिनेमाच्या नावाबद्दल नाना पाटेकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

पुढे म्हणाले की, तुम्हाला दुःख उधारीवर घ्यावी लागतात. आणि तुमची जि असतात ती वेगळी असतात. आणि उधारीवरील दुःख ती वागवावी लागतात. आणि ती वागवली तरच टाळ्या वाजवता आणि वा… काय छान काम केले आहे. आणि माझ्या आयुष्यात घडलेली अतिशय काहीतरी वाईट गोष्ट असेल, तिची आठवण करून मी ती एक ट्रगलिंग पॉईंट म्हणून आणि त्या इमोशन्स जागा करण्यासाठी वापर करत असतो. आणि त्यावेळेस माझ्या आयुष्यातील तो क्षण इतका विसरायचा प्रयत्न करत असतो, आणि तोच आठवून रडावं लागतो. आणि तुम्ही पाहताना टचकन डोळे भरत असतात. आणि वा काय ऍक्टिंग केली, असं तुम्हाला वाटत, मात्र आम्ही आमच्या त्या भावना विकत असतो, अशी खंत यावेळी नानांनी व्यक्त  केली आहे.

या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आपल्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत (Nana Patekar) मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube