Nana Patekar: तुमच्याही घरी येणार नानांनी लिहिलेलं पत्र! वाचा काय असणार मजकूर
Nana Patekar On Letter: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. सध्या नाना हे त्यांच्या या सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता नेमकं कोणाकोणाला मिळणार? याची आतुरता चाहत्यांना लागली आहे.
नेमकं काय म्हणाले नाना? सिद्धार्थ चांदेकरच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर नुकतचं नानांनी यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, “माझ्या थोड्याफार अनुभवातून मला एक उमगलं आहे. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दु:खाचा भागाकार आणि वेळेची वजाबाकी. असं माझं आणि माझ्या चिरंजीवाचं समीकरण अनोखं आहे. त्याच्यासाठी मी लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक आणि माझ्यासाठी तो मसावी महत्तम साधारण विभाजक. माणसानी आनंदात राहायचं, आनंद सर्वत्र वाटत राहायचं आणि वर्तमान काळात जगायचं. पत्र लिहित आहे तुम्हाला, कशासाठी हे माहित आहे का? 5 तारखेला आमचा ‘ओले आले’ मराठी सिनेमा येत आहे. पब्लिसीटी चालू आहे.
हिंदी सिनेमांसारखं आमचं मोठं बजेट आजिबात नाही. जेवढं आहे, तेवढ्यात भागवलं आहे. आमची दिवाळीसुद्दा कशी असते माहित आहे का? मोटरसायकल आणायची सायलेन्सर काढायचा अन् त्याच्या तीन लिटर पेट्रोल भरायचं आणि जोरात किक मारायची, हातातील एक्सिलेटर वाढवून तीन तास फटफट… झाली दिवळी. आजिबात बजेट नाही! त्यामुळे मला आता तुम्हीच सांगा शेवटचं पत्र कधी आलं? नाही आठवत तर नाय़ भारत पोस्टकडून आलेलं हे पत्र म्हणजे त्रिगुण आनंद आहे. 5 जानेवारीला ‘ओले आले’ थिएटरमध्ये येत आहे. त्यासाठी कधीपासून एकटाच बसून पत्र लिहित आहे. आवर्जून या!”
8 Doan 75 Teaser: ‘8 दोन 75′ : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा टिझर रिलीज
तुमच्याही घरी येणार नानांचे पत्र: नानांनी व्हिडीओला एक कॅप्शन देखील दिलं आहे, “महाराष्ट्राचे लाडके नाना सध्या पाठवत आहेत, त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्रं! जर तुमच्याही घरी त्यांचं पोस्टकार्ड आलं असेल तर त्याचा फोटो शेअर करा आणि @oleaalethefilm ला tag करा!” आता नानांचे हे पत्र नेमकं कोणाकोणाला मिळणार? याकडे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. ‘ओले आले’ हा सिनेमा 5 जानेवारीला रिलीज होत आहे. या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे.