मोठी बातमी : अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम; पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्याचे आदेश

Iran Israel Conflict इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत...

LPG Gas

LPG Gas

Iran Israel Conflict Affect On Commercial LGP Cylinder Supply In Pune : इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले असून, पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळं कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल असे सरकाकडून डिलर्सला सांगण्यात आले आहे.

इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा, जागतिक व्यापारावर सावट, पण भारतासाठी होर्मुज मार्ग खुला

नेमके आदेश काय?

इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे. डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. Iran Israel Conflict Affect On Commercial LGP Cylinder Supply In Pune

तुम्हीपण आखाती देशातील युद्धात अडकलाय? ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काय-काय मिळतं? नियम काय?

कुणाला बसणार फटका?

बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमधून व्यासायिक सिलिंडर पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, कालपासून (दि.5) हा पुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल्स, कॅफे, ढाबे, केटरिंग सर्विसेस, रेस्टॉरंट्स, बेकरी,मिठाईची दुकाने, ऑफिस कँटीन्स आदी ठिकाणांना या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एके काळचे जिवलग मित्र आता कट्टर शत्रू, अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास काय?

पुढील 30 दिवसांसाठी रशियन तेल खरेदी करा

युद्धामुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मालवाहू जहाजे बंद केल्याने याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. भारतासह अनेक देशात आता तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आता भारताला गरज पडल्यास रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याची सूट अमेरिकेने दिली आहे. फक्त समुद्रात आधीच अडकलेल्या टँकरमधूनच तेल खरेदी करता येईल अशी अट अमेरिकेकडून भारताला टाकण्यात आली आहे.

Exit mobile version