Download App

नवीन दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य; पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

राज्यात यापूर्वी अनेक वेळा हेल्मट सक्ती करण्याचा निर्णय झाला. परंतु त्या निर्णयास जनतेकडून विरोध झाला. आता दुचाकीस्वारांचे

  • Written By: Last Updated:

Helmets Mandatory for Two Wheeler  in Pune : पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूम मालकाला आता ग्राहकाला गाडीसह हेल्मेट देण्यासाची सक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व शोरूम मालकांना असे आदेश दिले आहेत.रोज रस्त्यावर होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे जीवितहानी (Helmets) रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मोटारसायकल चालकासह सहप्रवास जो करत आहे त्यालाही हेल्मेट सक्ती असणार आहे.

दुचाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती, नियम मोडणाऱ्यावर होणार ही कारवाई

स्त्यांवर पकडलं की कारवाई

राज्यात यापूर्वी अनेक वेळा हेल्मट सक्ती करण्याचा निर्णय झाला. परंतु त्या निर्णयास जनतेकडून विरोध झाला. आता दुचाकीस्वारांचे वाढत्या अपघातांमुळे पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत आहे. परंतु आता रस्त्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

का काढले हेल्मेट सक्तीचे आदेश

राज्यात दुचाकीस्वाराचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. पुणे शहरात (2024) मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. तसंच, आता गाडी विकताना संबंधीत शोरुमला हेल्मेटही द्याव लागणार आहे.

follow us