IT Engineer Suicide In Aundh Area : औंध परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पतीने पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केली आहे. आयटीआय अभियंता आहे. पॉलिथिन ची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार
सुदिप्तो गांगुली, प्रियांका सुदिप्तो गांगुली आणि मुलगा तनिष्क सुदिप्तो गांगुली (सर्व रा. औंध) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे तिघेही बेपत्ता असल्याची तक्रार सुदिप्तोच्या मित्रांनी चतुःश्रंगी पोलीस ठाण्यात दिली होती. सुदिप्तोने सर्वात प्रथम पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
बुधवारी दुपारी पोलिसांनी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले असता त्यांना घरात 3 मृतदेह आढळून आले आहेत. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली आहे. दरम्यान, सुदिप्तोने पहिले पत्नी, मुलाचा खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुदिप्तोने कोणत्या कारणामुळे इतके टोकाचे पाऊल उचचले हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कामाला होता. तो कोणत्या पदावर काम करत होता हे मात्र, समजू शकलेले नाही.