Jadhavr Law College’s special initiative: Students raise awareness of human rights by carrying posters and brochures : संविधान एक परिभाषा है, मानवता की आशा है… मानवी हक्क तोडणारा कोणताही कायदा अन्याय आहे, मिळून सारे देऊ ग्वाही, सक्षम बनवू लोकशाही… कर्तव्य हक्कांचे भान मिळवून देते संविधान… अत्याचार जुलूम नष्ट करा, मानवाधिकारांची कास धरा! अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी मानवी हक्कांचा जागर केला. हातात मानवी हक्क विषयक पोस्टर्स धरून, नागरिकांना माहितीपत्रके वाटप करत हक्कांची जाणीव करून दिली.
Special Work Human Rights Award : डॉ. केतन देशपांडे ‘विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने’ सन्मानित
मानवी हक्काबाबत समाजातील जागरूकता वाढवण्यासाठी पुण्यात जागतिक मानवाधिकार दिनाच्या औचित्याने ‘जागर मानवी हक्काचा’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट चौकात भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
गर्ल गँगची अखेरची एन्ट्री! ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ सीझन 4 चा प्राइम व्हिडिओवर धमाकेदार ट्रेलर रिलीज
यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास जाधवर, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूसचे उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आणि मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे संचालक अण्णा जोगदंड उपस्थित होते. यामध्ये जाधवर लॉ कॉलेज सह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पुण्यातील वाढते अंमली पदार्थांचे व्यसन आणि त्याकडे यंत्रणेचे होणारे दुर्लक्ष यावर प्रकाश टाकला.
अॅड. शार्दूल जाधवर म्हणाले, मानवी हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून समाजात त्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आजही अनेक लोकांना त्यांच्या हक्कांची पूर्ण माहिती नाही. म्हणूनच, जागतिक मानवाधिकार दिनाच्या औचित्याने ‘जागर मानवी हक्काचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
