Jagdish Mulik : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करा… भाजपच्या ‘या’ नेत्याचे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना पत्र!

पुणे : कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे तिथे आता पोटनिवडणूक होत आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा वारसा मुक्ता टिळक यांनी समर्थपणे सांभाळला आहे. पुणे शहराच्या विकासकामांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष […]

Jagdish Mulik Sharad Pawar Uddhav Thakrey

Jagdish Mulik Sharad Pawar Uddhav Thakrey

पुणे : कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे तिथे आता पोटनिवडणूक होत आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा वारसा मुक्ता टिळक यांनी समर्थपणे सांभाळला आहे. पुणे शहराच्या विकासकामांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी राज्यातील तसेच शहरातील प्रमुख नेत्यांना केले आहे.

जगदीश मुळीक म्हणाले की, कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून या संदर्भात मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पुणे शहरातील सर्वच प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष यांना ही पोटनिवडणूक बिनवरोध करा, असे आवाहन करणारे पत्र पाठवले आहे.

मुक्ता टिळक यांचे सर्व पक्षांबरोबर संबंध अतिशय उत्तम होते. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणूक बिनवरोध झाल्यास खऱ्या अर्थाने मुक्ता टिळक यांना ती श्रद्धांजली ठरेल, असे जगदीश मुळीक यावेळी म्हणाले.

Exit mobile version