Download App

विद्यार्थीनीचे प्राण वाचवणाऱ्यांना शाबासकी, जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षीस

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ एका विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुणे हादरलं. एकतर्फी प्रेमातून (one sided love) तरुणीवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी शंतनू जाधव (Shantanu Jadhav) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, शंतनूने विद्यार्थिनीवर हल्ला केला, त्याचेवळी अभ्यासिकेत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी प्रसांगावधन राखत तरुणीचा जीव वाचावला. याविद्यार्थ्यांची लेशपाल जवळगे (Leshpal Jawalage) आणि हर्षद पाटील (Harshad Patil) अशी नावं असून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेऊन त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांच बक्षीस दिल्याचं जाहीर केलं. (Jitendra Awha announced a big reward for saving the life of a student)

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल…., अशा आशयाचं ट्विट आव्हाड यांनी केलं.

घटना काय?
आज मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस ठाण्याजवळ एका तरुणाने कोयत्याने तरुणीवर हल्ला केला. या घटनेत मुलगी थोडक्यात बचावली, तर तिचा मित्रही जखमी झाला. शंतनू जाधव असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखतात. आज सकाळी मित्राच्या स्कूटीवरून तरूणी कॉलेजला जात होती. तेवढ्यात अचानक त्या दोघांसमोर शंतनू आला. काही क्षणातच त्याने पिशवीतून कोयता काढून तरुणीवर हल्ला केला. त्यावेळी तरुणीसोबत असलेला तिचा मित्राने प्रतिकार केला. मात्र, तोही या हल्ल्यात जखमी झाला. मात्र, तरुणी थोडक्यात बचावली.

समृध्दीवर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, कार कठड्याला धडक्याने एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी 

दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी दर्शना पवार खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. त्यामुळे या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना आरोपीवर मोक्का लावण्याचे आदेश दिलेत. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीया आहे. या तरुणीला वाचवण्यात स्थानिक तरुण लेशपाल जवळगे याने महत्वाची भूमिका बजावली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. लेशपालचे मनापासून आभार!

तर याच घटनेसंदर्भात पुणे शहर DCP गिल यांची पुणे शहर उपाध्यक्षा स्वंरदा गौरव बापट यांनी भेट घेऊन आरोपीवर कठोर करवाई करावी, पुणे शहरातील पेठ भागामध्ये महिला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावी तसेच दामिनी पथक आणि त्या संदर्भातिल हेल्प लाइन नंबर याची महिलांमध्ये जनजागृती अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणात लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने प्रसंगावधान दाखवून त्या तरूणीला वाचवले त्याबद्दल त्या तरुणाचे कौतुक स्वंरदा बापट यांनी केले

Tags

follow us