Download App

मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर मोठी घडामोड; ‘बीरआरएस’च्या शिलेदारांच्या हाती तुतारी

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

BRS in Maharashtra Elections : लोकसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा अन् आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात (Maharashtra Elections) दाखल झालेल्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस (Bharat Rashtra Samiti) पक्षाची थोड्याच दिवसांत वाताहत झाली. तेलंगणाच्या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची सत्ता गेली. तसा महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाचा आलेख कमालीचा घसरला. लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील ज्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला ते नेते आता विधानसभेच्या तोंडावर घरवापसी करू लागले आहेत.

आता तर या पक्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाची महाराष्ट्र शाखाच शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या 6 ऑक्टोबर रोजी पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकारी आणि शरद पवारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणु्कीच्या तोंडावर बीआरएस पक्षाची महाराष्ट्र शाखाच शरद पवार गटात विलीन होण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर महाविकास आघाडीचं राजकीय बळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

‘बीआरएस’ला नगरी झटका! घनश्याम शेलारांना पक्षात घेत काँग्रेसची बेरीज; अजितदादांनाही धक्का?

विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे नेते, पदाधिकारी तुतारी चिन्हावर रिंगणात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या संभाव्य घडामोडीमुळे महायुतीला मोठा धक्का बसू शकतो.

follow us