कल्पेश यादव यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल; ‘मएसो’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत गैरप्रचार केल्याचा आरोप

Kalpesh Yadav MESO : मुकुंददास लोहिया महाविद्यालयाबाबत गैरप्रचार केल्याप्रकरणी कल्पेश यादव यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला.

Kalpesh Yadav MESO : मुकुंददास लोहिया महाविद्यालयाबाबत गैरप्रचार केल्याप्रकरणी कल्पेश यादव यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला.

Kalpesh Yadav MESO : मुकुंददास लोहिया महाविद्यालयाबाबत गैरप्रचार केल्याप्रकरणी कल्पेश यादव यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला.

Kalpesh Yadav Defamation Case MESO: पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत समाजमाध्यमांवरून कथित गैरप्रचार केल्याप्रकरणी शिवसेना (उबाठा) युवाशाखेचे सचिव कल्पेश यादव यांच्याविरोधात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी स्थानिक न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

सहा वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र; पंजाब निवडणुकीआधी भाजप-अकाली दलाची युती, अमित शहांची मोठी घोषणा!

यादव यांनी जाणीवपूर्वक आणि संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 222 आणि 223 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 356 अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला 166 वर्षांचा शैक्षणिक वारसा आहे. संस्थेच्या 75 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पूर्वप्राथमिक ते पीएचडीपर्यंत सुमारे 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेने अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली आहे. या महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), राज्याचा तंत्रशिक्षण विभाग आणि अन्य संबंधित नियामक संस्थांच्या आवश्यक मान्यता मिळाल्या असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

प्रियांश आर्यचा मैदानात धुमाकूळ! 181 धावा ठोकत ख्रिस गेलचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

महाविद्यालय मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केलेल्या कर्वे रस्त्यावरील पत्त्यावरच महाविद्यालय सुरू असल्याचा दावाही संस्थेने केला आहे. मात्र, यादव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर महाविद्यालय अस्तित्वातच नसल्याचा प्रचार केला. तसेच महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आणि तेथे आवश्यक सुविधा नसल्याचे आरोप केले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, यादव यांनी यूट्यूबवर महाविद्यालयाबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केले. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे महाविद्यालय बेकायदा सुरू असल्याची तक्रार केली. तसेच पत्रकार परिषद घेऊनही हे आरोप केल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या कथित आरोपांमुळे संस्थेची आणि महाविद्यालयाची बदनामी झाल्याचा दावा करत आंबर्डेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Exit mobile version