Download App

कसबा, पिंपरी चिंचवड मतदार संघासाठी आता MNS ची एन्ट्री

पुणे : कसबा विधानसभा (kasba by election) व पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली. परंतु कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना यश येणार नसल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची (mns ) एन्ट्री झाली. मनसेने ४ जणांच्या नावांची यादी तयार करण्यात आली.

कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक गुरुवारी होणार असून मनसेची नावे राज ठाकरे यांच्यांकडे गेली आहे. मनसेने कसबा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीसाठी गणेश सातपुते, अजय शिंदे, नीलेश हंडे आणि गणेश भोकरे या चौघांची नावे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. या नावांवर राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.

कसबा पेठची जागा काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली नव्हती. परंतु पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित करत आपणच निवडणूक लढवली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यानुसार ९ उमेदवारांची यादी तयार केली. आता यासंदर्भात अजित पवार बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेले काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे गुरुवारी मुंबईत येत आहे. याअगोदर त्यांनी १६ इच्छुकांची व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखती घेतल्या. जम्मू- काश्मीरमध्ये अडकून पडल्यामुळे त्यांनी या मुलाखती व्हिडिओ कॉलवर घेतल्या होत्या. आता गुरुवारी ते मुंबईत आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीसंदर्भात निर्णय घेणार आहे.

Tags

follow us