Kasba By Election : बिचुकलेंवर ‘मतांचा पाऊस’ अन् दवेंचंही डिपॉझिट जप्त

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) कॉंग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)हे मोठ्या मताधिक्क्यानं विजयी (Win) झाले आहेत. धंगेकर यांनी भाजपच्या (BJP)हेमंत रासने (Hemant Rasne)यांना पराभूत केलंय. या पोटनिवडणुकीतील धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांचीच जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतेय. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघात (Kasba […]

Bichukale 123

Bichukale 123

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) कॉंग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)हे मोठ्या मताधिक्क्यानं विजयी (Win) झाले आहेत. धंगेकर यांनी भाजपच्या (BJP)हेमंत रासने (Hemant Rasne)यांना पराभूत केलंय. या पोटनिवडणुकीतील धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांचीच जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतेय.

अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघात (Kasba Bypoll Results) 47 मतं मिळाली आहेत. तर आनंद दवे यांना 296 मतं मिळाली आहेत. अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेली मतं अत्यल्प असून ती आकडेवारी अत्यंत निराशाजनक आहे.

कसब्यातील निवडणूक विधानसभेत; नाना पटोले-फडणवीस भिडले

अभिजीत बिचुकलेचा मोठा चाहतावर्ग असूनही पहिल्या फेरीत त्याला फक्त 4 मतं मिळाली होती. तर दुसरीकडं ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा आहे असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना 12 मतं मिळाली होती. अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला अधिक मतं पडली आहेत. नोटाला एकूण 1401 एवढी मतं मिळाली आहेत.

या पोटनिवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात होते. त्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार 62 हजार 244 मतं मिळाली. हे दोन उमेदवार सोडून इतर सर्वच्या सर्व (14) उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणारंय. कसबा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकलेनं जोरदार प्रचार केला होता. बिचुकलेला कपाट चिन्ह मिळालं होतं. पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांवर भर दिला होता. मात्र कसबामधील मतदारांनी बिचुकलेंना डावल्याचं दिसून आलंय.

Exit mobile version