Download App

Kasba Bypoll काँग्रेसच्या धंगेकरांनी ‘ती’ संधी साधलीच!

पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपचे १९९५ पासून एकहाती वर्चस्व होते. त्यात सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गिरीश बापट हे सन २०१९ साली खासदार झाल्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक झाल्या. परंतु, गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे काँग्रेसला १९९५ नंतर ही पोटनिवडणूक जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आली आणि काँग्रेसने ती संधी साधलीच.

कसब्यात भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात होते. गेल्या ३० वर्षांपासून रवींद्र धंगेकर हे जनमानसात काम करत असून त्यांनी या पूर्वी कसब्यात भाजपचे गिरीश बापट यांना दोन विधानसभा निवडणुकीत घाम फोडला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर हे नक्की विजयी होतील, असे राजकीय जानकारांचा कयास होता. तो धंगेकर यांनी सार्थपणे खरा करत इतिहास घडवला आहे.

Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

कसबा विधानसभा मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी विजयी झाले होते. पुढे खासदारकीची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक लागली. तेव्हा भाजपने तत्कालीन नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी महापौर वसंतराव थोरात यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपतील पाच नगरसेवक अचानक फुटून काँग्रेसमध्ये गेल्याने तेव्हा गिरीश बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे थोरात तेव्हा विजयी झाले.

Tags

follow us