Kasba Bypoll : शरद पवारांच्या भेटीला रवींद्र धंगेकर!

पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) उपस्थित होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र […]

Sharad Pawar Ravindra Dhangekar

Sharad Pawar Ravindra Dhangekar

पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) उपस्थित होते.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचा प्रचारसभा, रॅली, वैयक्तिक गाठीभेटी यावर निवडणूक प्रचार सुरु आहे. काल त्यांनी अचानकपणे धक्का देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात जाऊन आपल्या जुन्या सहकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या.

तर शुक्रवारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

Exit mobile version