Download App

Kasba Bypoll : तर मी काँग्रेसचा बंडखोर म्हणून लढणार! पुण्यात काँगेसमध्ये तिकीट वाटपाआधीच गोंधळ सुरु

  • Written By: Last Updated:

“जर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर मी बंडखोर म्हणून निवडणूक लढणार,” अशी भूमिका पुण्यातले काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे. पुण्यात आज भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब दाभेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. पुण्यात कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी महापौर कमल व्यवहारे, नीता परदेशी, गोपाल तिवारी यांच्यासह अगदी १६ जणांनी इच्छुक म्हणून नावे नोंदविली होती आणि मुलाखती देखील दिल्या होत्या . मात्र यातील केवळ धंगेकर आणि दाभेकर हे दोघेच निवडणूक लढविण्यासाठी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेश काँग्रेसकडून अंतिम नावे दिल्लीला पाठवली आहेत.

यामध्ये रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर जर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर मी बंडखोर म्हणून निवडणूक लढणार. गेली ४० वर्षे मी काँग्रेसच काम करत आहे. त्यामुळे मला संधी दिली जावी. त्यापेक्षा बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला संधी दिली तर मी बंडखोर म्हणून निवडणूक लढवणार अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.

Tags

follow us