Kasba-Chinchwad Bypoll : भाजप-महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुरळा : शरद पवारही उतरले मैदानात

पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपने (BJP) प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीही बाजूचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत […]

Sharad Pawar Eknath Shinde

Sharad Pawar Eknath Shinde

पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपने (BJP) प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीही बाजूचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. ते कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात प्रचारसभा घेणार आहे.

भाजपचे कसबा पेठ मतदार संघातील उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघातील उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रॅली काढणार आहेत. तर आशिष शेलार दिवसभर बैठका घेणार आहेत.

तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभा होणार आहे.

Exit mobile version