पुणे : पुण्यातील कसबा (kasba) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ही निवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे या पक्षांनी येथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पटोले पुणे (Nana Patole Pune Visit) दौऱ्यावर येत आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यानंतर सुरू झालेला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व पटोले यांच्यातील वाद. या पार्श्वभुमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
याबाबत पटोले म्हणाले, की ‘भाजपमध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत खदखद आहे त्या पद्धतीने राज्यात काँग्रेसमध्ये (Congress) कुठेही नाही. दि.१५ रोजी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आहे. मात्र, मी त्यावेळी पुणे दौरा निश्चित केला आहे. प्रचाराचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी या बैठकीस उपस्थित नसेन. तशी माहिती मी राज्याचे प्रभारी महासचिव एच. के. पाटील (H. K. Patil) यांना दिली आहे. आमच्या दृष्टीने निवडणुका महत्वाच्या आहेत. कसबा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांचा ज्या पद्धतीने गवगवा केला गेला ते पाहता कुणाचे किती बंडखोर उमेदवार आहेत त्याची तुलना एकदा करून पहा,’ भाजपमध्ये जास्त खदखद आहे. काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक लढत आहे. येथे दोन्ही उमेदवार यश मिळवतील अशी येथील परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.
थोरात वादावर दिले उत्तर
मुंबईत एच. के. पाटील आ. बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत असे विचारले असता ते म्हणाले, की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी चार दिवस पुण्यात मुक्कामी आहे. मला जे काही सांगायचे होते त्याची माहिती मी फोनद्वारे पाटील यांना दिली आहे, असे स्पष्ट करत या मुद्द्यावर आधिक बोलणे त्यांनी टाळले.