पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची जाहीर नाराजी आणि हिंदू महासभेने केलेल्या मागणीमुळा कसबा पोटनिवडणुकीत नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिगर ब्राह्मण उमेदवार दिल्याने भाजप (BJP) ला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेस पक्ष याचा फायदा घेऊन कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) मतदार संघात ब्राह्मण उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यासाठी रोहित टिळक यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आचा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भाजपने कसबा पोटनिवणुकीत टिळक कुटुंबा ऐवजी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपवर ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यांची उमेदवारी फायनल असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे रासने आणि धंगेकर यांच्यामध्ये सामना होईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता रोहित टिळक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघापैकी कसबा आणि कोथरुडमध्ये ब्राह्मण समाजाचा मतदार मोठा आहे. मात्र, कोथरुडमध्ये भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर आता टिळक कुटुंबात उमेदवारी देण्या ऐवजी रासने यांना संधी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितेल जात आहे. त्याचाच फायदा काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.