Download App

Kasba Peth Bypoll Election : ‘त्यांनी’ गुडघ्याला बाशिंग बांधल्याने निवडणुकीचा घाट!

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) बिनविरोध व्हावी, अशी भारतीय जनता पक्षाने (BJP) मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने ही निवडणूक होत आहे. भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ असल्याने आम्ही देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहोत, असे भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी सांगितले.

Lahu Kanade : नक्की सोयीनं कोण वागतं? माध्यमं की राजकारणी...|LetsUpp Marathi

प्रत्येक निवडणुकीपूर्वी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना ‘वाडेश्वर कट्ट्यावर’ (Wadeshwar Katta) आमंत्रित करतो. आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने सध्या कसबा पेठ पोटनिवडणूक लागली आहे. त्या पार्शवभूमीवर आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करून ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. सर्वजण या विनंतीला मान देऊन ‘वाडेश्र्वर कट्ट्या’वर आले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ही खेळीमेळीचे वातावरण जपत असल्याबद्दल धन्यवाद मानतो. यावेळी भाजपचे धीरज घाटे, हेंमत रासने, शैलेश टिळक, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे उपस्थित होते.

धीरज घाटे म्हणाले की, मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे भाजप पक्षनेतृत्वाला कळवले आहे. तशी उमेदवारी मागितली आहे. पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.

माझी पत्नी मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा पेठ पोटनिवडणूक होत आहे. आमदारकीचा फक्त सव्वा वर्षाचा कालावधी राहिला आहे. मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाकडे या पोटनिवडणुकीत आमच्या घरातच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. परंतु, पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल. तो आम्हाला मान्य असेल, असे आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी सांगितले.

अंकुश काकडे म्हणाले की, महापालिका, आमदार अथवा लोकसभा अशा सर्वच निवडणुकीत पुणे शहरातील वातावरण चांगले टिकून राहावे, शांतता राहावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी असे आम्ही ‘वाडेश्र्वर कट्ट्या’च्या माध्यमातून केले आहे.

Tags

follow us