Download App

Kasba Peth Bypoll काँग्रेसचा उमेदवार अखेर ठरला! धंगेकर आणि रासने यांच्यात थेट लढत

पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Prth Bypoll) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congres) रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे कोणत्याही क्षणी त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता रासने आणि धंगेकर यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून धंगेकर रिंगणात उतरल्याने कसब्याची ही निवडणूक चुरसीची दोणार आहे. एकेकाळी रविंद्र धंगेकर यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये रविंद्र धंगेकर यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला.

खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बापट यांच्यासमोर क़डवे आव्हान उभे केले होते. त्यावेळी त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता.

Tags

follow us