Download App

Kasba Peth Bypoll संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते रिंगणात!

पुणे : ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Briged) कसबा पेठ पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेड ही पोटनिवडणूक लढवणार असून संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहिते मंगळवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कसब्याची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसब्याच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीही कसब्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले असून आता संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे मात्र महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us