Download App

दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद; चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार

महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,

  • Written By: Last Updated:

Chandrakant Patil : महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार चंद्रकांत पाटी (Chandrakant Patil) यांनी केला. तसेच, दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव समर्पित आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

संग्राम जगतापांची ताकद वाढली, तब्बल 53 व्यापारी संघटनांनी दिला पाठिंबा 

समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूडमधील आशिष गार्डन येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी समुत्कर्ष सोशल फाउंडेशनचे धनंजय रसाळ, अमोल शिंगारे, सचिन जाधव, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, सुशील मेंगडे, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, स्वप्नील राजिवडे, कैलास माझिरे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Assembly Election: इव्हीएमची माहिती प्रशासनाकडून मिळेना; राहुल कलाटे यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींसोबत मी खूपच जोडला गेलो आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. महायुती सरकार दिव्यांग बांधवांच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभे आहे. शासनाच्यावतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांगांचा मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिन, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

follow us