पुणे : पुण्यात मारहाणीच्या (Pune News) घटना आता काही नवीन नाही राहिल्या. दररोज पुण्यातील एखाद्यातरी भागातून अशी बातमी येतच असते. आता तर कोथरूडमध्ये भांडण (Pune Beating Incident) सोडवायला गेलेल्या व्यक्तीच्याच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिकेत पडवळ हा रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सार्वजनिक रोडवरुन जात होता. त्यावेळी आरोपी सुरज शिंदे याने अनिकेतला बोलावून घेतले. काहीही कारण नसताना ‘तुला लई माज आला आहे काय?’ असं म्हणत त्याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
गोरक्ष पडवळ (वय ५०, रा. क्रांतीसेना कमान, सुतारदरा, कोथरुड) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. जखमी व्यक्तीचा मुलगा अनिकेत गोरक्ष पडवळ (वय २०) याने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुरज दिलीप शिंदे (वय २८), सचिन मातेरे, साठे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) ३२६, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार क्रांतीसेना कमान सुतारदरा कोथरुड येथे रविवारी (दि. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
यावेळी अनिकेतचे वडिल गोरक्ष पडवळ हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले. तर आरोपींनी आरोपींनी संगनमत करुन त्यांनाही हाताने मारहाण केली. त्यातील एक आरोपी साठे याने तर जवळ पडलेला एक मोठा दगड डोक्यात मारुन गोरक्ष पडवळ यांना गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.