Download App

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्री फडणवीसांनी…

Pune Crime : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये विविध गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. वारजे भागामध्ये या गॅंगची दहशत पाहायला मिळाली. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. (Koyata Gang in Pune Supriya Sule Demand to Devendra Fadanvis )

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत देखील गृहमंत्री फडणवीसांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

लंकेंकडून विखे पाटलांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, तुझ्या पोराला…

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

‘पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली आहे. या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करतात. नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करतात. वारजे,पुणे येथेही या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.

माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे झाले आहे.पुण्यातील संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत.’

काय आहे घटना?

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग सक्रीय झाली आहे. यावेळी पुण्यातील वारजे रामनगर कॅनॉल रस्त्यावर सात गाड्यांची या गॅंगने कोयत्याने वार करून तोडफोड केली. काळ्यारंगाच्या दुचाकीवरून हे अज्ञात तीन जण आले होते. त्यांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज लावण्यात येत आहे. त्यानंतर पोलीस घटनालस्थळी दाखल झाले खरे पण तोपर्यंत हे गुंड पळून गेले होते. तर दोन दिवसापूर्वी देखईल याच भागामध्ये गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच त्यात आता पुन्हा एकदा हा परिसर हादरला आहे.

Tags

follow us