लंकेंकडून विखे पाटलांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, तुझ्या पोराला…
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि अहमनदगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके आणि विखे कुटुंबीय यांच्यात जोरदार सामना दिसून येत आहे. या अगोदर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातदेखील चांगलाच कलगीतुरा रंगलेला होता. आता पुन्हा हा वाद सुरु झाला आहे.
यावेळी लंके यांनी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांना कंसाची उपमा दिली. कंस देखील श्रीकृष्णाला बालिशच समजत होता, असे लंके म्हणाले. याअगोदर एकेठिकाणी बोलताना राधाकृष्ण विखेंनी लंकेंना बालिश म्हटले होते. त्यावर लंकेंनी उत्तर दिले. लंके म्हणाले की, आपल्या नांदूर पठारच्या वारकऱ्याला मारण्यात आलं. तुम्हाला जर एवढी कळकळा असेल तर त्यांना भेटायला जायचे होते. हे भेटायला तर गेले नाहीच उलट माझे बोलणे विखेंना जिव्हारी लागल्याचे निलेश लंके म्हणाले.
Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…
तसेच निलश लंकेला दुसऱ्यांदा आमदार व्हायचे नसल्याचे विखे म्हणाले होते. त्यावर लंके म्हणाले की, मी आमदार होणार की नाही हे आमची जनता ठरवेल. पण तुझ्या मुलाला दुसऱ्यांदा खासदार व्हायचे की नाही ते आम्ही ठरवू, असे म्हणत लंकेंनी विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला.
Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?
काय आहे नेमके प्रकरण
निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका वृद्ध वारकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखेंनी निलेश लंके हे पहिल्या टर्मचे आमदार असून त्यांनी बालिश वागणं बंद करावं, त्यांना पुन्हा निवडून यायची इच्छा दिसत नाही, असे म्हटले होते. त्याला लंकेंनी उत्तर दिले आहे.