Koyata Gang Crime: पुण्यात (Pune) कोयता गँगची (Koyta Gang) दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल रात्री कोंढवा (Kondhava) परिसरात कोयता गँगने एका टपरी चालकावर हल्ला करत टपरीची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता गँगने गल्ल्यात हात घालून पैसे काढण्याचाही प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
झोपेचा अभाव आरोग्यासाठीच नाही तर नातेसंबंधांसाठीही हानिकारक! ‘इतक्या’ तासांची झोप आवश्यकच
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता कोयता गँगने टपरी चालकावर कोयत्याने हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं दिसतं. सुरूवातील दोन तरुण पानटपरीवर उभे राहून सिगारेट पीत असताना दिसतात. त्यानंतर काहीच वेळात ते तरुण आणि त्यांचे एक-दोन सहकारी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी अचानक टपरीवर आणि टपरी चालकावर हल्ला करतात. टपरीमधील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली : आमदार संग्राम जगताप
या हल्ल्यापूर्वीही शितल पेट्रोल पंपाजवळील चार-पाच दुकानांवरही अशाच पद्धतीने हल्ले करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले असून, कोयता गँगच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी सामान्य पुणेकर करू लागले आहेत.