Download App

Kasba By Election : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency)आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनानंतर त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक (By Election)होणारंय. त्यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला (BJP) मोठी कसरत करावी लागली आहे. त्यात अखेर उमेदवारी हेमंत रासने (Hemant Rasne)यांना देण्यात आली आहे. टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपनं घराबाहेरील उमेदवार दिल्यानं मोठी नाराजी दिसून येतेय.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak)यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता पुन्हा भाजपमधील नाराजी नाट्य उघड झालंय. ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेलाय. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळं कसब्यात भाजपविरोधातील नाराजी उफाळून आल्याचं दिसून येतंय.

कसबा पोटनिवडणुकीसाठी आज हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागल्याचे दिसताहेत. या बॅनरवर कोणाचंही नाव नाही. कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलंय.

महाविकास आघाडीनं रवींद्र धंगेकर यांच्यासारखा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं भाजपनं लोकांमध्ये असणारा चेहरा उमेदवार देण्याचं ठरवलंय आणि म्हणूनच शैलेश टिळक यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, यातून आता ब्राम्हण समाजच भाजपवर नाराज झाला आहे, असं दिसतंय.

Tags

follow us