Download App

दिवाळीच्या खरेदीसाठी झुंबड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लक्ष्मी रस्ता बंद

  • Written By: Last Updated:

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नागरिकांची (Pune traffic ) खरेदीसाठी मोठी रेलचेल असते. त्यामुळं वाहतूक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे पुण्यातील नेहमीच गजबजलेला असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील (Lakshmi Road) वाहतुक आज रविवारी (ता. 5 नोव्हेंबर) पुणे वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे.

Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप 

दिवाळीचा प्रारंभ हा गुरूवारी होणार आहे. गुरूवारी (९ नोव्हेंबर) रमा एकादशी आणि वसुबारस आहे. तर रविवारी (१२ नोव्हेंबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरक चतुर्दशीला नवीन कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. त्यामुळं ऐन सुट्टीच्या दिवशी लोक खरेसाठी गर्दी करतात. त्यातच आज रविवार असून दिवाळीच्या् आधीचा सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी बहुसंख्य नागरिक आज घराबाहेर पडले. यामुळे लक्ष्मी रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

शिवाय, खरेदीसाठी अनेकजण मोटारीतून येत येतात. त्यामुळं वाहतूक विस्कळीत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे. त्यामुळे पुण्यात दिवाळी सारखा सण तर मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. सोबतच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात वाहतुकीची समस्या भेडसावतेय. त्यामुळे नागरिकांना दिवाळीची खरेदी करण्यासाठी कुठलाही कोळंबा होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर कपडे, सोन व अन्य महत्त्वाचे दुकान आहेत. त्यात लक्ष्मी रस्ता हा निमुळता असल्याने येथून जाणं-येणं जिकरीचं होऊन जातं, यामुळे येथून वाहतूक सुरू राहिल्यास नागरिकांना पायी चालणे देखील अवघड होऊन जातं. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आज वाहतूक बंदी केल्याने लक्ष्मी रस्त्यावर आता हजारोच्या संख्येने नागरिक आपल्याला पायी चालताना पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर फक्त आजच्या दिवस वाहतूक बंदी असणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचं पुणेकरांनी स्वागत केलं असून यामुळे वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागणार नाही.

Tags

follow us