Lalit Patil Arrested : फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजत आहे. यावर स्वतः ललित पाटीलच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’
काय म्हणाले ललितचे आई-वडिल?
ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याला अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळालं आहे. मात्र त्याचं म्हणणं ऐकूण घ्याव. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी. मात्र त्याचं एन्काऊंटर करून करू नये. अशी मागणी यावेळी ललितच्या आईने केली. तसेच त्या म्हणाल्या की, सुरूवातीला आमची चौकशी झाली. त्यावेळी पोलिसांना काहीही मिळालं नव्हतं.
Vijay Wadettiwar : कोणत्या मंत्र्याचा आशीर्वाद ललित पाटीलला होता? वडेट्टीवारांचा थेट सवाल
तर त्याचे वडील म्हणाले की, ललितच्या अटकेवर बोलण्याची आमची मनस्थिती नाही. आमचा आमच्या दोन्ही मुलांशी कोणताही संवाद झालेला नाही. तर आम्हाला त्याच्या या गुन्ह्याबाबत आम्हाला माहित नाही. आम्हाला त्याची अशी काही ड्रग्ज कंपनी आहे. हे माहीत असतं तर आम्ही त्याला रोखलं असतं. तसेच त्याच्यावर जी कारवाई होत आहे. ती योग्य आहे. मी शासकीय नोकरदार आहेत. आम्ही तो जेव्हापासून जेलमध्ये आहे. तेव्हा पासून त्याच्याशी संबंध तोडलेले आहेत. कारण उतारवयात असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे. असं म्हणत यावेळी ललित पाटीलच्या आई-वडीलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
Pimpri-Chinchwad : ‘ड्रीम 11’ वर टीम लावणं भोवलं; ‘करोडपती’ झालेले सोमनाथ झेंडे निलंबित
तसेच ते पुढे म्हणाले की, जर आम्हाला काही झालं तर आमचे नातू देखील रस्त्यावर येतील. त्यामुळे सरकार करेल ती कारवाई आम्हाला मान्य आहे. पण आम्हाला त्रास होईल असं काहीही करण्यात येऊ नये. अशी विनंती यावेळी ललितच्या वडीलांनी केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी ते या धक्क्यामुळे रूग्णालयात दाखल झालेले होते.