Download App

Lalit Patil प्रकरणी निलंबित डॉक्टरांचा धक्कादायक दावा; म्हणाले डीनच्या आदेशानेच…

  • Written By: Last Updated:

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुणे पोलिसांनी तीन वर्षापूर्वी अटक केली होती. त्यानंतर तो सातत्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होता. अशात मागील 9 महिन्यांपासून तो सातत्याने ससूनमध्येच अॅडमिट होता. मात्र या काळात 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी अटक केली मात्र त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या ससूनचे डॉक्टर प्रविण देवकाते यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

काय म्हणाले डॉक्टर प्रविण देवकाते?

ललित पाटीत प्रकरणात ससूनचे डॉक्टर प्रविण देवकाते यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र ललित पाटील हा ड्रग्ज माफिया होता हे मला माहिती नव्हते. त्याचबरोबर तो वेगळ्या कारणासाठी वेगळ्या विभागात रूग्णालयात दाखल झाला होता. तसेच त्याच्यावर माझ्याकडे उपचार नंतर सुरू करण्यात आले. तसेच मी हे उपचार ससूनचे डीन म्हणजे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या आदेशानुसारच करत होतो. असा दावा देवकाते यांनी केला आहे.

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

त्याचबरोबर ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम वाढवणे असेल त्याच्यावर तात्काळ सर्जरी करण्याचा निर्णय असेल या सर्वगोष्टी ससूनचे डीन म्हणजे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या आदेशानुसारच सुरू होत्या. त्याचबरोबर देवकाते असं ही म्हणाले की, त्यांच्या विभागातील सर्व चाचण्या झाल्यानंतर त्यांनी ललित पाटीलला रूग्ण म्हणून दुसऱ्या विभागाकडे सुपूर्द केलं होतं. मात्र तरी देखील आपलं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे हे निलंबन चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai वर लठ्ठपणाचं संकट; 46 टक्के लोकांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, पालिकेने दिला अहवाल

दुसरीकडे ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससून रूग्णालयचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात ठाकूर यांचा हात असल्याचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर (दि.10) ठाकूर यांना ससूनच्या डीन पदावरून हटवण्यात आले आहे.

ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललितने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. त्यानंतर ललितला पळून जाण्यात कुणाचा हात होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर, धंगेकरांनी थेट आरोप करत पाटीलला पळवून लावण्यात संजीव ठाकूर यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतरा आता ससूनचे डॉक्टर प्रविण देवकाते यांनी देखील ठाकूर यांच्याकडेच बोट दाखवले आहे. त्यामुळे आता ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Tags

follow us