Download App

धक्कादायक खुलासा! ललित पाटील पैशांच्या जोरावर पोलीस अन् डॉक्टरांना करायचा मॅनेज

  • Written By: Last Updated:

पुणे : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता चौकशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या जोरावर ललित पाटील (Lalit Patil) पोलीस आणि रूग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मॅनेज करत होता अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. तसेच ज्या दिवशी पाटील ससून रूग्णालयातून (Sasoon Hospital) बाहेर पडला त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना आपण दीड तासात परत येतो असं सांगत फरार झाला होता. त्याला पळून जाण्यासाठी दोन महिलांनी मदत केल्याचंही आता समोर आलं आहे. (Lalit Patil Drug Case Update)

पुण्यातून पळालेला ललित पाटील मुंबई पोलिसांना कसा सापडला? वाचा इनसाईड स्टोरी

याशिवाय ससूस रूग्णालयात मुक्काम वाढवण्यासाठी ललितनं डॉक्टर आणि पोलिसांना पैसे दिल्याचेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, तो ससूनमधून ड्रग्ज रॅकेट चालवण्यासोबतच रूग्णालयाच्या बाहेर जाऊन बैठका घेत असल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. त्याच्या नजर ठेवणाऱ्या पोलिसांनादेखील ललित पैसे देऊन मॅनेज करत होता. त्यामुळे त्याला रूग्णालयातून ये-जा करण्यास सोपे जात होते.

फरार झालेल्या दिवशी ललित दीड तासात येतो असं पोलिसांना सांगून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रूग्णालयात असताना ललित पाटील अनेकदा ससून रूग्णालयाबाहेर त्याचा भाऊ भूषण पाटीलला भेटत होता.

आश्रय देणाऱ्या प्रज्ञा कांबळेला अटक

दुसरीकडे, पुणे पोलिसांनी याप्रकरणात एक मोठी कारवाई करत ललित पाटीलला आश्रय देणाऱ्या प्रज्ञा कांबळेसह अर्चना निकम या दोन महिलांना अटक केली आहे. प्रज्ञा कांबळेकडे ललितची बेनामी संपत्ती असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. फरार होण्यापूर्वी ललित प्रज्ञाकडे एक दिवस राहिल्याचेही सांगितले जात आहे. तसेच त्याने प्रज्ञाकडून 25 लाख घेतल्याची माहिती समोर येत आहे.

FD मोडली, सोनं घेतलं असा होता ललित पाटीलचा देशाला रामराम करण्याचा प्लॅन

ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार

ललित पाटीलला अटक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आता ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असं ते म्हणाले. मला काही गोष्टी कळल्या आहेत, पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्यवेळी मी बोलेन. पण, एवढंच सांगतो की, एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असं फडणवीस म्हणाले.

…तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? ड्रग्स रॅकेट प्रकारणावरुन रोहीत पवार यांचा उद्विग्न सवाल

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं

राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी तमिलनाडू येथून अटक केली आहे. त्यानंतर आता स्वतः ललित पाटीलने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळलो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजन दावा केला आहे. तसेच यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान ललित पाटील नेमकी कोणा-कोणाची नावे घेतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पाटीलने वरील खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे ललित याला ससूनमधून पळवण्यामागे कुणाचा हात आहे. यात काही राजकीय पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tags

follow us