Download App

FD मोडली, सोनं घेतलं असा होता ललित पाटीलचा देशाला रामराम करण्याचा प्लॅन

  • Written By: Last Updated:

पुणे : पोलिसांच्या हातावर तुरी देत ससून रूग्णालयातून पळालेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी अखेर तमिळनाडूतून मुसक्या आवळल्या आहेत. पळ काढल्यानंतर पाटीलने नाशिक, धुळे छ. संभाजीनगर येथे प्रवास केल्याचे सांगण्यात येत असून, तो चेन्नईतून श्रीलंकेत जाणार होता. यासाठी त्याने पूर्ण नियोजन केले होते. हे सर्व होत असताना यंत्रणा काय करत होत्या असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

ललित पाटीलचं काय होतं नियोजन?

चेन्नईमार्गे ललित पाटील श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. यासाठी त्याने खास नियोजन केले होते. ससूनमधून पळ काढल्यानंतर पाटील धुळे, नाशिक आदी शहरांसह इतर ठिकीणी वास्तव्ययास होता. नाशिकमध्ये वास्तव्यास असताना ललितने त्याची बँकेतील FD मोडली होती. त्या पैशातून त्याने किलोभर सोनेदेखील विकत घेतल्याचे समोर आले आहे. हे घेऊन तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे हा सर्व व्यवहार एवढा सहजासहजी कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नार्को टेस्ट करा

ललित पाटील हा कुणी छोटा ड्रग्ज तस्कर नव्हता. त्याने ज्या पद्धतीने मी ससूनमधून पळालो नाही तर, आपल्याला पळवून लावण्यात आल्याचा दावा ललित पाटीलने केला आहे. त्यामुळे ललितला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत असा प्रश्नदेखील अंधारे यांनी उपस्थित करत या प्रकरणाची राज्य स्तरावर नव्हे तर, केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच ललित पाटीलसोबत दादा भुसे, शंभूराजे देसाई, ज्या पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पाटील पळाला तो अधिकारी, उपचार करणारे डॉक्टरांसह ससूनचे डीन या सर्वांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

ललित पाटीलला पुण्यात ‘एन्काऊंटरची’ भीती

मी पुण्यातील ससून रूग्णालयातून पळून गेलो नव्हतो तर, मला पळवण्यात आल्याचा खळबळजन दावा ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil)  याने कॅमेरासमोर बोलताना केला आहे. तमिलनाडू येथून ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (दि.18) त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दुसरीकडे ललितला एन्काऊंटरची भीती वाटत असून, आपल्या जीवाला पुणे पोलिसांकडून (Pune Police) धोका असल्याचा दावा ललितने न्यायालयात केल्याचे एका वकिलाने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तर, ललितचे एन्काऊंटर करू नये अशी भावनिक मागणी ललितच्या आईने अटकेनंतर केली आहे.

एन्काउंटर करू नका

ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांची पाठ थोपटली जात आहे. तर, दुसरीकडे त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना दुसरीकडे याबाबत त्याच्या आई-वडिलांनी भावविक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  ललितला अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळालं आहे. मात्र त्याचं म्हणणं ऐकून घ्याव त्यानंतरच त्याच्यावर कारवाई करावी. मात्र, त्याचं एन्काऊंटर करू नये अशी भावनिक मागणी ललित पाटीलच्या पालकांनी केली आहे. सुरूवातीला आमची चौकशी झाली त्यावेळी पोलिसांना काहीही मिळालं नव्हतं असेही ललितच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Tags

follow us