Lawyer should not cast aspersions on my daughter’s character Vaishnavi’s father cried : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर आता बुधवारी पुणे न्यायालयात या प्रकरणात (Vaishnavi Hagawane) सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरु होते आम्ही ते पकडले होते. असा युक्तीवाद देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आज वैष्णवीच्या वडीलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवेल जाऊ नये अशी विनवणी केली. तसेच यावेळी ते ढसाढसा रडले.
काय म्हणाले वैष्णवीचे वडिल?
काल आरोपींचे वकील बोलले ते समाजाने ऐकलं. पण ते ते चुकीचे बोलले. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहे. हगवणेंनी केलेले कृत्य आणि त्यामुळे माझ्या मुलीचा गेलेला बळी याला कलाटणी देण्यासाठी वकीलांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत विविध आरोप केले आहेत. मोबाईल चॅटिंग बाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलाही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतला आहे.माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला जर मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मी तिला मोबाईल दिला कशाला? तर आरोपी जावई याला एक लाख 52 हजाराचा मोबाईल दिला, त्यांनी मागितला होता,मागितल्या नुसार दिला. विकत घेतलेला मोबाईलची रिसीट दाखवली. आजही मी आरोपीला दिलेल्या मोबाईलचे हप्ते भरत आहे.
भलताच प्रकार! फरार निलेश चव्हाणची खोटी माहिती देऊन पोलिसांनाच बनवलं; फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
होण्यासाठी छळ केला नाही म्हणता. गाडी नाही मागितली म्हणता मग जेव्हा फॉर्च्यूनर देण्या अगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली.मला फॉर्च्युनर नाही दिली. तर मी यांची हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं म्हणून फॉर्च्यूनर दिली. आरोपीकडे 5 कोटीच्या गाड्या नाहीत. त्याच्याकडे एकच गाडी आहे मी दिलेले. मला मागितले गेली ही गाडी लग्न मोडेल म्हणून अगोदर दोन लग्न मोडली होती. माझ्याकडे गाडी,चांदीच्या ताटाची मागणी सोन्याची मागणी अधिक महिन्यात इतर मागणी करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहेत. जर सुन मयत आहे हे कळले तर त्यांना बाळाला त्याच्याकडे द्यायचे सुचले कसे? निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी होता. त्यावेळी तिथं तो ही तिथं होता.
विश्वास टाकला, पण दहा कोटींना चुना लावला ! दोघांनी मालकाचा ‘असा’ घात केला ?
ज्यावेळी आमचे कुटुंब बाळाला आणायला गेले. त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हते. परत आम्हाला सांगण्यात आले. मग आमचे कुटुंब त्या बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाण याच्या घरी गेले. त्यावेळी त्याने पिस्तूल दाखवून भीती दाखवली. निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ कसे गेले? हा आमचा प्रश्न आहे.फोनवरून पोलिसांना आम्ही माहिती दिली. हगवणे यांनी आमच्याशी निगडीत बांधकाम व्यवसायिककडे पैसे मागितले होते. चार चापटा मारणे म्हणजे गुन्हा नाही हे वाईट आहे. वकील असे बोलतात ही हास्यास्पद गोष्ट आहे. आमचा जालिंदर सुपेकर यांचा काही संबंध आला नाही. मामा म्हणून सुपेकर जालिंदर अस पत्रिकेत नाव आहे.त्याचा हगवणे कुटुंबाशी संबंध आहे. वैष्णवी आत्महत्या करण्याबद्दल पाच ते सहा दिवस सातत्याने हगवणे कुटुंब मारहाण करत होते.वैष्णवीवर आता काही आरोप करतील शिंतोडे उडवू नका. असं म्हणत वैष्णवीचे वडीलांना पत्रकार परिषदेत रडू कोसळले.