पवनराजे निंबाळकर थरारक हत्या प्रकरणाचा आज निकाल, 20 वर्षांनंतर ओमराजेंच्या वडिलांना न्याय मिळणार?

Verdict in Pawanraje Nimbalkar murder case चा तबब्ल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे.  त्यामुळे न्याय मिळाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Verdict In Pawanraje Nimbalkar Murder Case

Verdict in sensational Pawanraje Nimbalkar murder case will Omraje’s father get justice after 20 years : धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजेनिंबाळकर या दोन घराण्यांतील संघर्ष. यातून 20 वर्षांपूर्वी झालेली थरारक हत्या. ज्या हत्येने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजवली होती. कारण ही थरारक हत्या होती धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल पवनराजे निंबाळकर यांची ही हत्या होती. त्यानंतर आज या प्रकरणाचा तबब्ल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे.  त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय मिळाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सगळ्या अफवाच! संपूर्ण खासदार ठाकरेंसोबतच…, राऊतांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या

दरम्यान आजच्या निकाला अगोदर वडिलांना न्याय मिळावा अशा  अपेक्षा व्यक्त करत पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची.माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा.

हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..! आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत. न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.

मनोरंजन क्षेत्रात संचिताचा कुणीही गॉडफादर नव्हता; अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर तिचे आजोबा काय म्हणाले?

यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी मे महिन्यात निश्चित करण्यात आली होती. मात्र काही आरोपी प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 16 जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण 3 जून 2006 रोजी घडलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यासह चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता.

महागाईचा मारा सुरूच! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोल-डिझेलही महागणार?

या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान राजकीय वैमनस्यातून हा कट रचण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला. प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काहींवर हत्येचा कट रचणे, तर काहींवर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, आरोपींना शिक्षा होते की त्यांची निर्दोष मुक्तता होते, याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

follow us