NDRF च्या टीम तैनात! नाशिक जिल्ह्यात 500 मिलीमीटर पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत (Rain) मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यासाठी पुढचे चार ते पाच तास असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्याता आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही भागात 200 ते घाट माथ्यावर 500 मिलीमीटर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून कंट्रोल रूम आणि NDRF ची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासांत अतिवृष्टी आणि वादळी पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नाशिक, उपविभागीय दंडाधिकारी कळवण आणि तहसीलदार कळवण यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगगड ते नांदुरी घाट रस्ता आज 31 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणि भाविकांच्या प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे.
बीडमध्ये खळबळ! पालकमंत्र्यांच्या बैठकीला हजर असलेला अधिकारी 40 लाखांची लाच घेताना पकडला, काय घडलं?
पावसाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शनिवार, 1 ऑगस्टपासून घाट रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे विश्वस्त संस्थेकडून कळविण्यात आले आहे.. दरम्यान, भक्तनिवासात वास्तव्यास असलेल्या भाविकांनी पुढील प्रशासकीय सूचना मिळेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. धोम धरणातून सुरू असलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून वाई शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून, शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहेत.दरम्यान, वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जांभळी धरण शंभर टक्के भरले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्र, घाट आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.