बीडमध्ये खळबळ! पालकमंत्र्यांच्या बैठकीला हजर असलेला अधिकारी 40 लाखांची लाच घेताना पकडला, काय घडलं?

सुनेत्रा पवार यांच्यासमवेतची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले.

News Photo   2026 07 31T194817.205

बीड जिल्ह्यातही आज मोठी खळबळजणक (Beed) बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकाऱ्यास त्यांच्याच घरी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बीडमधील या कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबल उडाली आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार दोन दिवसीय बीड दौऱ्यावर असून आज त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यासंमवेत, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी, जिल्हा विकासाच्या दृष्टीने त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यास काही तासांतच लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन

श्रीनिवास लखमावार असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडलं आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमवेतची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.

पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

follow us