Download App

वळसे पाटलांच्या शिलेदाराला शरद पवारांची ताकद; देवदत्त निकम यांच्यावर नवी जबाबदारी

पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते देवदत्त निकम (Devdutt Nikam) यांची पुण्याच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निकम यांना या संदर्भातील पत्र देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. निकम हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय असून आता पुण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. (Leader of NCP (Sharad Pawar) group Devdutt Nikam was elected as the working president of Pune)

दरम्यान, निकम यांच्या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना तगडे आव्हान मिळणार असल्याची चर्चा आहे. निकम यांची वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि शिष्य म्हणून ओळख होती. पण आता त्यांच्याच शिलेदाराला शरद पवार यांनी ताकद दिल्याने आंबेगाव विधानसभा आणि शिरुर लोकसभेला वळसे पाटील आणि अजित पवार गटाला निवडणूक अवघड होणार असल्याचे सांगितले जाते.

Manmohan Singh : पटेल यांचा एक नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…

निकम हे मागील अनेक वर्षांपासून वळसे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच हाताला धरुन निकम राजकारणात आले. आंबेगावच्या वाड्या-पाड्यांवर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राष्ट्रवादी वाढविली. वळसे पाटील यांनीच निकम यांना 2014 साली शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली होती. त्यावेळी त्यांना जवळपास 3 लाख 41 हजार मतं मिळाली होती.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या मंचर बाजार समितीच्या निवडणुकीपासून वळसे पाटील आणि निकम यांच्यात काहीशी कटूता आली होती. देवदत्त निकम यांना वळसे पाटील यांनी उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे निकम यांनी बंडखोरी करत बाजार समितीची निवडणूक लढवून विजय मिळवला होता, तेव्हापासून निकम हे वळसे पाटील यांच्यापासून वेगळे झाल्याचे पहायला मिळाले.

Sanjay Raut : ‘आमचा नाही, न्यायालयाचाच दबाव’; राणेंच्या आरोपांवर राऊतांचं थेट उत्तर

अशात जुलै महिन्यात वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जात शरद पवार यांच्याविरोधात बंडखोर केली.  त्यावेळी निकम यांनी मात्र पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निकम यांनीही पवारांनी आदेश दिला तर वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता पवारांनी आदेश दिला नसला तरी नवी जबाबदारी देऊन निकम यांना ताकद दिल्याने आंबेगावमध्ये निकम विरुद्ध वळसे पाटील असा सामना होताना दिसणार आहे.

Tags

follow us