Letsupp Diwali Ank 2026 : नमस्कार मंडळी! यंदाच्या दिवाळीत काहीतरी दमदार आणि प्रेरणादायी वाचायचंय का? तर मग तुमची हीच प्रतीक्षा संपवण्यासाठी ‘लेट्स अप’चा विशेष दिवाळी अंक बाजारात आलाय. ज्याची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. राजकारण असो, समाजकारण, उद्योग, प्रशासन, क्रीडा किंवा मग कला क्षेत्र… महाराष्ट्राने नेहमीच देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत होत्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योजक आणि लेट्सअपचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव आणि पद्मश्री पोपटराव पवार या दिग्गजांच्या परीक्षक मंडळानं अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली ‘लेट्सअप लक्षवेधी महाराष्ट्रीय’ मधील 24 नावं आणि एक जागतिक पायाभूत प्रकल्पाचा या अंकात समावेश आहे. पण थांबा… या अंकात नेमकं काय दडलंय? कोणकोणते जबरदस्त लेख वाचून तुमच्या अंगावर काटा येईल? हे जाणून घेऊया यंदाच्या लेट्सअपच्या अंकात कोणकोणते ‘लक्षवेधी’ लेख वाचायला मिळणार आहेत त्याबद्दल…
लक्षवेधीची सुरूवात होते ती, सह्याद्रीच्या अभेद्य डोंगररांगांना भेदत साकारलेला आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत आविष्कार असलेला आणि मुंबई-पुणे प्रवासाचा चेहरामोहरा बदलून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने. यानंतर प्रत्येक महिलेला अभिमान वाटावा अशा समाजकारणातून सुरू झालेला प्रवास ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या, संयमी पण खंबीर नेतृत्व करणाऱ्या सुनेत्राताई पवार यांच्या जीवनवाटेचा प्रेरणादायी संगम उलगडणारा विशेष लेख तुम्हाला अंकात वाचायला मिळेल. सोबतच, महाराष्ट्राचे लाडके नेते ते दिल्लीतील मोठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे आणि भाजपचा हुकमाचा एक्का असणाऱ्या विनोद तावडे यांच्या राजकीय प्रवासाची इनसाइड स्टोरी तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवेल अशीच आहे.
सोशल मीडिया केवळ मनोरंजनासाठी नाही, तर समाजपरिवर्तनासाठीही वापरता येतो, हे सिद्ध करून दाखवणारा आणि हाती स्कूटर आणि डोळ्यांसमोर वीस शाळांचं स्वप्न व तीन कोटींचं ध्येय ठेवून समाजकारणात ‘रिअलस्टार’ ठरलेल्या सिद्धेश लोकरे याचा ध्येयवेडा प्रवास वाचून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल. तसेच, पुणे शहरात ध्वनिप्रदूषणाविरोधात एकाकी लढा उभारून एका सामान्य नागरिकाच्या असामान्य जिद्दीवर प्रकाश टाकणारे विद्यानंद बापट यांचा शांततेसाठीचा लढा नक्कीच तुमच्या मनाचा ठाव घेईल. याच मालिकेत, कोल्हापुरी तडका, आक्रमक भाषणशैली आणि बेधडक विचारांनी नव्या पिढीचा बुलंद आवाज बनलेल्या विवेकानंद पाटील याचा संघर्षमय प्रवास आपल्याला प्रचंड प्रेरणा देऊन जाणारा असाच आहे. आणि हो, आकाशात मृत्यू समोर असताना तब्बल 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांची शौर्यगाथा वाचून नक्कीच तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
उद्योग विश्वाचा विचार केला तर, थेट ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या केस स्टडीमध्ये झळकलेले भारताचे ‘ॲल्युमिनियम मॅन’ भरत गीते यांची यशोगाथा थक्क करणारी आहे. तसेच, एका छोट्या दुकानातून सुरू झालेला प्रवास ते ‘एसएस रिटेल लिमिटेड’ची गरुडझेप मारत अडीच हजार कोटींचे साम्राज्य उभे करणारे सिद्धार्थ शाह यांच्या यशाचं गणित थक्क करणारं आहे.
शिर्डीच्या एका गरीब शेतकरी कुटुंबातून थेट संरक्षण क्षेत्रापर्यंत मजल मारणारे उद्योजक गणेश निबे यांचा प्रवास असो, किंवा ‘पुणे मॉडेल स्कूल’ आणि ‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रमांतून ग्रामीण शाळांचं रूप बदलणारे जि.प.चे CEO गजानन पाटील यांचा प्रशासकीय प्रवास असो, अंकातील प्रत्येक पानावर एक नवी ऊर्जा लपलेली आहे.
“सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही” अशी कठोर भूमिका घेत अन्नसुरक्षेचे सरकारी रक्षक ठरलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या व आव्हानात्मक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांच्या कर्तृत्वाची कहाणी सांगणारे लेख वाखाणण्याजोगे आहेत.
क्रीडा जगतात, खेळ सोडण्याच्या विचारापासून थेट आशियाई स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक जिंकत ऑलिम्पिकचा कोटा मिळवणारा साताऱ्याचा साहिल जाधव, बांबूच्या कामठ्यांवर सराव करत दक्षिण कोरियाच्या दिग्गजांना नमवणारी तिरंदाजीतील भारताची 17 वर्षीय ‘सुवर्णकन्या’ कुमकुम मोहोद आणि सांगलीतील मातीतील मैदान ते थेट भारतीय संघाचे नेतृत्व करत जागतिक क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटला नवी ओळख देणारी स्मृती मंधाना यांचा प्रवास वाचून प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असे वाचनीय लेख नक्कीच तुम्हाला आवडतील.
आता वळूयात मनोरंजक आणि राजकीय पटलावरील धमाकेदार प्रवासाकडे…अस्सल रांगडी शैली आणि मातीशी नाळ जोडून मराठी सिनेमाला राष्ट्रीय स्तरावर नेणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा 100 कोटींचा बॉक्स ऑफिसचा बॉस म्हणून झालेला गौरव आणि बालमजुरीचे चटके सहन करत ‘गोंधळ’ चित्रपटाद्वारे थेट ऑस्करच्या शिखरावर मराठी झेंडा रोवणारे संतोष डावखर यांचा प्रवास थक्क करणारा प्रवास तुम्हाला अंकात वाचायला मिळेल. हॉलिवूडच्या ‘ड्यून’, ‘इंटरस्टेलर’ ते आगामी बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटापर्यंत जागतिक व्हीएफएक्सचा डंका वाजवणारे नमित मल्होत्रा यांची यशोगाथा तर डोळे दिपवणारी आहे.
यासोबतच, 5 दशकांची अखंड कलासाधना करून ‘पद्मश्री’ मिळवणारे लोककलावंत रघुवीर खेडकर, दिवंगत आर. आर. (आबा) पाटील यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे तरुण आमदार रोहित पाटील, राजकारणातला उच्चशिक्षित चेहरा असलेल्या आमदार श्रीजया चव्हाण, धारावीचा सुशिक्षित आवाज डॉ. ज्योती गायकवाड, वसईचा नवा खंबीर आवाज स्नेहा दुबे-पंडित आणि ‘ट्री आर्मी’पासून द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांपर्यंत शाश्वत विकासाचे युवा वारसदार ठरलेले आमदार सुहास बाबर यांच्या विकासात्मक वाटचालीचा वेध घेणारा हा अंक खऱ्या अर्थाने प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाने वाचायलाच हवा असा आहे. तर, मंडळी, हे फक्त लेख नाहीत तर, ही प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाची आणि संघर्षाची गाथा आहे. त्यामुळे ही प्रेरणादायी पुस्तक रूपातली अंकाची पर्वणी अजिबात मिस होऊ द्यायची नसेल तर, आजच ‘लेट्सअप’चा हा दिवाळी अंक २०२६ विकत घ्या आणि आवर्जून वाचा…
