Ketan Agrawal Murder : होयं, मला चेतन हवा होता, पण केतनला मी..,; सियाने सगळेचं पत्ते उघडले!

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. केतनला चेतनबद्दल सांगितलं होतं, तरीही लग्न रद्द केलं नसल्याचं सियाने सांगिलं.

ketan agrawal

ketan agrawal

Ketan Agrawal Murder Case : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांड (Ketan Agrawal Murder Case ) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचं अनेक दिवसांपासून सुनियोजित कट सुरु होता. केतनची होणारी पत्नी सियाने केतनला चेतनसोबतच्या संबंधांबद्दल सांगितलंही होतं, तरीही केतनला माझ्याशी लग्न करायचं होतं असा धक्कादायक खुलासा सियाने पोलिसांसमोर केला आहे.

नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी; 29 जूनला शिक्षा सुनावणार

पोलिस सुत्रांच्या माहितीनूसार, केतन अग्रवालला कधी ढकलायचं, याबाबत तिने आणि चेतनने प्लॅनिंग केलेलं होतं. पण त्याआधी सियाने केतनला आपल्या संबंधांबद्दल माहिती दिली होती. माझं चेतनवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं आहे, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असं खुद्द सियाने केतनला सांगितलं होतं. त्यावर केतनने सियाला नकार देत लग्न रद्द करण्यास नकार दिला होता. आता हे लग्न रद्द होऊ शकत नसल्याचं केतनने सियाला सांगितलं होतं.

Mansoon : बळीराजा सुखावला! सर्वदूर पावसाची ‘मुसळ’धार; नद्या, ओढे तुडूंब वाहु लागले…

काहीही केल्या केतन लग्न रद्द करण्यास तयार नसल्याने अखेर सिया आणि चेतनने केतनला संपवण्याचा प्लॅन आखला. लोहगडावर गेल्यानंतर सिया आणि चेतनमध्ये एक संकेत ठरला होता. मी केतनसमोर असताना खाली वाकल्यानंतर केतनला दरीत ढकलून द्यायचं असा प्लॅन त्या दिवशी लोहगडावर अंमलात आणला गेला. लोहगडावर सिया खाली वाकली आणि चेतनने केतनला दरीत ढकलून दिलं.

लग्नासाठी सियावर कुटुंबियांचा दबाव होता..

हे लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आणि संपन्न आहे, तसेच त्याच्याशी लग्न केल्यास तिचं भविष्य सुरक्षित होईल, असे सियाच्या कुटुंबीयांना वाटत होतं. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याने ते त्याच्यासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते.

अनुप धोत्रे यांच्या विकासकामांच रिपोर्ट कार्ड; मंजूर 99 कामांपैकी पूर्ण फक्त 36, उर्वरित कामांचे काय?

दरम्यान, सुरुवातीला हा अपघात वाटत होता, केतनच्या वडिलांना संशय बळावल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन चौधरीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं होतं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. यामुळे या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेलं. नंतर प्रियकर चेतन चौधरी यालाही तेथे बोलावून घेतलं. लोहगड किल्ल्यावर दोघांनी केतनला डोंगरावरून खाली ढकलून दिलं व त्याचा खून केल्याचं चेतनने चौकशीत सांगितलं.

Exit mobile version