Download App

पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात लगबग; कशी आणि कुठे होणार मतमोजणी?

Lok Sabha Election मतमोजणीसाठी पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात कशी आणि कुठे होणार मतमोजणी? जाणून घेऊ...

Lok Sabha Election 2024 Pune District Ready for Vote Counting : देशासह राज्यात लोकसभेची निवडणुक ( Lok Sabha Election ) पार पडली. त्यानंतर आथता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते उद्या 4 जूनला लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची अंतिम तयार झाली आहे. अवघ्या काही तासांवर आलेल्या या मतमोजणीसाठी पुणे जिल्ह्यातील मतमोजणीचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात कशी आणि कुठे होणार मतमोजणी? जाणून घेऊ…

कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने विचारांना नवी उंची; निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट

पुणे जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यांच्या मतमोजणीच नियोजन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार पुणे आणि बारामतीची मतमोजणी ही कोरेगाव पार्क गोदाम या ठिकाणी होणार आहे. मावळची मतमोजणी ही छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी होणार आहे. तर शिरुरची मतमोजणी ही रांजणगाव एमआयडीसीमध्ये होणार आहे.

टीम इंडियाचा सुपर फिनिशर केदार जाधवने धोनी स्टाईलने जाहीर केली निवृत्ती

यामध्ये पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी टेबल आणि राऊंडमध्ये मावळसाठी 143 राऊंड – 106 टेबल, पुण्यासाठी 121 राऊंड 122 टेबल, बारामतीसाठी 136 राऊंड – 124 टेबल, शिरूरसाठी 149 राऊंड – 112 टेबलचं नियोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी माध्यमांना माहिती दिली.

उद्या सकाळी वाजता ईव्हीएम मशीन आणि टपाल मत पेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे सील उघडण्यात येईल. निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढले जाईल. त्यानंतर 8.30 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. तसेच या मतमोजणी प्रक्रियेची सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग त्याचबरोबर व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण देखील करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज