Download App

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

पुणे : श्रींच्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir)स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणं (sun rays)पडली आणि जय गणेशचा एकच जयघोष झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपती (Dagadusheth Ganpati)मंदिराच्या गाभाऱ्यात सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या (Magh Janmostsav)पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणं श्रींच्या मूर्तीवर पडतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला. श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणं पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणं स्नान घालत असल्याचा भास होत होता.

सकाळी 8 वाजून 18 मिनिटांपासून ते 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की, मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्यानं गाभाऱ्यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश येतो. त्यामुळं भाविकांना हा सोहळा अनुभवता आला.

कोश्यारींवर टीका करत नव्या राज्यपालांचं जयंत पाटलांकडून स्वागत

माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणं श्रींच्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्यानं ही किरणं मूर्तीवर पडतात, असंही यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितलं.

Tags

follow us