Download App

Mahadev Jankar म्हणतात… गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता!

  • Written By: Last Updated:

पुणे : ‘आपल्या चौकात आपली औकात’ या न्यायाने राष्ट्रीय समाज पक्ष काम करत आहे. आमच्या पक्षाची भाजपसोबत महाराष्ट्रात युती आहे. भाजपची ताकद मोठी आहे. एकनाथ शिंदे यांचे ४० आमदार आहेत म्हणून शिंदे आज भाजप सोबत आहेत. माझी ताकत कमी आहे. आमचा पक्ष वाढावा म्हणून आम्ही आधी त्यावर काम करत आहे. गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता आहे. राहुल कुल हा देखील माझाच कार्यकर्ता होता. मात्र, दोघेही आता भाजपमध्ये (BJP) गेले आहेत. कोणी कुठे जायचे तो प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे मी पडळकरला सल्ला देणार नाही. तो एक कार्यकर्ता आहे तर मी राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय नेता आहे. कार्यकर्ता आणि नेता यातील फरक तुम्ही समजून घ्या, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष (President) महादेव जानकर यावेळी म्हणाले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

महादेव जानकर म्हणाले की, गोपीचंद पडळकर हा कार्यकर्ता आहे आणि मी नेता आहे. त्यामुळे तुम्ही आधी नेता आणि कार्यकर्त्यामधील फरक तुम्ही ओळखायला हवा. तसेच मी भाजपकडे मंत्रीपद मागणार नाही, त्यांना वाटलं तर देतील. नाही वाटलं देणार नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. त्या मार्गांवरून आमचा प्रवास सुरु आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील. परंतु, मी मात्र युतीचा धर्म पाळणार आहे. त्यामुळेच कसबा पेठ मतदार संघ निवडणुकील भाजपचे उमेदवार हेमंत रासने याच्या प्रचारासाठी आलो आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज