मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत.
हेही वाचा : Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस, किसान सभेची टीका
अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला कोणत्या घोषणा केल्या ते पाहूया
पुणे मेट्रोसाठी सध्या 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर असून पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मान्यता
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे ला विशेष निधी
मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे
राज्यात 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क तयार केले जाणार. नागपूर, एमएमआर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरीसह पुण्याचा समावेश
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
राज्यातील अनेक स्मारकांसाठी विशेष निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी आणि भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी रुपये निधीची घोषणा
हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी एटीएफ मूल्यवर्धित कर 18 टक्के, या योजनेमध्ये रायगड, मुंबईसह पुण्याचा समावेश