Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि सत्ताधारी महायुतीकडून मोर्चेबांधणी (Maharashtra Elections) सुरू आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही (Manoj Jarange Patil) चाचपणी सुरू केली आहे. मनोज जरांगे यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. मात्र तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हालाही राजकारणाची भाषा करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आता त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आताही एक महत्वाची बातमी हाती आली आहे. जरांगे यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा अहवाल मागवला आहे. या सर्व मतदारसंघात जरांगे पाटील उमेदवार देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत येत्या 29 ऑगस्ट रोजी घोषणा होईल, अशी माहिती मिळाली आहे.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार; मनोज जरांगेंचा इशारा
तुम्ही आरक्षण (Maratha Reservation) दिलं नाही तर मग आम्हाला तुमच्या उमेदवारांना पाडावं लागणार आहे, सरकार सोबत आता कोणतीही चर्चा झाली नाही. उभे करायचे की पाडायचे हे ठरवू, पण यांची खुर्ची घालवणार, अधिवेशन आचारसंहिता असा यांचा वेळकाढूपणा चालला आहे. आरक्षण द्यायला १२ महिने लागत नाही, हे आरक्षण देत नाही असा अंदाज दिसत आहे. छगन भुजबळच्या नादात तुम्ही सत्त्ता घालवून बसणार आहात. आम्ही सगळ्या तयारीला लागू, तुमचा कार्यक्रम लावणार असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
पुणे जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे शहरात शिवाजीनगर, खडकवासला, कसबा, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कँटोन्मेंट, पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात मनोज जरांगे पाटील उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा आहे. कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार आहेत आणि मतदारसंघाची काय गणितं आहेत याची माहिती घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी हा अहवाल मागवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश!