Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा

Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 24 जुलै रोजी आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या बेमुदत उपोषण मागे घेतला आहे. तर आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन करत आगामी विधानसभा निवडणुकीत आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे रहा असं सांगतिले आहे.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मी दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहा. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडणून द्या. मी त्यांच्याकडून बरोबर काम करून घेतो. असं जरांगे म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व जातीधर्मांचे उमेदवार देणार आहे. फक्त समाजाने मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करा. जर मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडणून द्या. मी त्याच्याकडून काम करून घेतो. देवेंद्र फडणवीस आमच्या आई – बहिणाला बोलत आहे हे आम्ही सहन करायचे का? आमचा सरकारसोबत संपर्क शून्य आहे. आम्हाला जो पर्यंत सहन होत आहे तो पर्यंत आम्ही सहन करून नंतर सर्वकाही बाहेर काढू. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान कितीही पाऊस किंवा पूर असेल तरीही आमच्या माताभगिनी रस्त्यांवर दिसतील असं पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही, प्रसाद लाड बोलत आहे पण फडणवीस त्यांना थांबवत नाही. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळही नाही. आपले गोरगरीब फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसायचे, पण ते उत्तर देत नाहीत. माझ्यावर टीका करणे हे त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी बोललो नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना समजून सांगा कारण माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल.

फडणवीस यांनी इतर नेत्यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहे. मी सरकारवर विश्वास ठेवला होता मात्र हे बिलिंदर लोकांनामध्ये टाकत आहेत. मला ट्रॅप केले जात आहे. आज राज्यात फडणवीस खरी सत्ता चालवत आहे त्यामुळे भाजपचे वाटोळे होते आहे अशी टीका देखील यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केली.

Nilesh lanke : मोठी बातमी! 15 दिवसात चौकशी होणार, निलेश लंके यांचे उपोषण मागे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube