विधानसभा एकत्र पण… आगामी निवडणुका युतीसह लढण्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

विधानसभा एकत्र पण… आगामी निवडणुका युतीसह लढण्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar for Announces Vidhansabha election Mahayuti : राज्यामध्ये लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha election) लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महायुती म्हणून भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना पक्ष यांची रणनिती आखली जात आहे. या दरम्यान मात्र अजित पवार यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी जरी विधानसभा एकत्र लढणार असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मात्र ते स्वतंत्र लढणार असल्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. ते आज पुण्यामध्ये बोलत होते.

फडणवीससाहेब, हा अहंकाराचा कळस, तुमच्या पापाचा घडा…; रोहित पवारांचा हल्लाबोल

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी लोकसभा आणि विधानसभा मित्रपक्ष म्हणून महायुतीसह लढणार असला तरी देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र आपल्याला आपल्या ताकदीवरच लढवायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपआपल्या तालुक्यात गटात व्यवस्थित काम करावं. लोकांपर्यंत सरकारचं काम आणि योजना पोहचवाव्यात अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत अशोक चव्हाण हरवले; कोपर्‍यातील खुर्चीवर मिळाले स्थान

दरम्यान राज्यात आता विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याने महाविकास आघाडी जोमात आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून पराभवाचं मंथन केलं जात आहे. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. महायुतीत खटके उडणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी आधीच दिल्या आहेत. त्यानुसार महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. जागावाटप लवकरात लवकर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा होण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारास पुरेसा वेळ मिळाला नाही. अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये. जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा लवकर व्हावी अशी आग्रही मागणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीतही करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube