maharashtra police officer transfer: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांची बदली झाली असून, त्यांना पुणे ग्रामीणचे अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री, भाजपमध्ये प्रवेश केल्याची पत्नी रिवाबाने दिली माहिती
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तेजस्वी सातपुते यांची मुंबईतून पुणे शहरात पोलिस उपायुक्तपदावर बदली झाली आहे. तेजस्वी सातपुते या पूर्वी पुणे शहरात नियुक्तीला होत्या. त्यांच्याकडून वाहतूक उपायुक्तची जबाबदारी होती. तर मुंबईतील पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेचे सहायक पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नागूपर शहरचे उपायुक्त निमित गोयल यांची मुंबईत बदली झाली आहे. तर राज्य राखीव पोलिस सोलापूरचे विजय चव्हाण यांची सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे.
ठाकरेंचं दबावतंत्र, मविआत संघर्ष अटळ? ठाकरेंनी 22 संभाव्य उमेदवार हेरले
संदीपसिंह गिल हे धडाकेबाज अधिकारी म्हणून गणले जातात. पुणे शहरात उपायुक्तपदाची जबाबदारी पार पडताना त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. गणेशोत्सवाची तयारीत ते होते. त्याच कालावधीत त्यांची बदली झाली आहे.
राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुण्यातील पोलिस उपआयुक्त संदिपसिंह गिल यांच्याकडे पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. #punepolice #pune #IPS pic.twitter.com/JEPFBeLHvK
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 5, 2024